Download App

हनीट्रॅप प्रकरणात ट्विस्ट! करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट, पीडितेलाच आणले समोर; आरोपांनी उडाली खळबळ

एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. या पत्रकार परिषदेनंतर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Karuna Munde Press Conference : राज्यात सध्या हनी ट्रॅपचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. काही अधिकारी आणि आमदारांची ‘तसली’ कृत्ये पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. या हनीट्रॅपच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे. यातच आता या सगळ्या वादात करुणा मुंडे यांनी (Karuna Munde) एन्ट्री घेतली आहे. एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. या पत्रकार परिषदेनंतर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

‘त्या’ दोघांनी केला अत्याचार, पीडितेचा आरोप

या पत्रकार परिषदेत संबंधित पीडित महिलेने अनेक धक्कादायक आरोप केले. पोलिसांच्या वर्तणुकीवर थेट आरोप केले. एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. कळवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावरही आरोप करण्यात आले. मोबाइल नंबर घेऊन त्यांनी मेसेज केले. पोलीस ठाण्याच चहासाठी बोलावले होते. अधिकाऱ्याच्या बायकोने फोन करून चहा पिण्यासाठी घरी बोलावले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याची बायको नव्हती. अधिकाऱ्याने पाण्यात गुंगीची गोळी टाकून मला आधी बेशुद्ध केले. नंतर दोघांनी लैंगिक अत्याचार केला असा अत्यंत खळबळजनक आरोप महिलेने केला.

नाशिकनंतर पुण्यातही खळबळ! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढा अडचणीत; आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला

यानंतर या दोघांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तिथे कुणीच माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. वरिष्ठांकडे दाद मागितली मात्र त्यांच्या पातळीवरही काहीच कारवाई झाली नाही. पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले. या प्रकरणात पुरावेही दिले. परंतु पोलिसांनी उलट मलाच धमकावले असा आरोप पीडित महिलेने केला. यासंदर्भात माझ्या पेन ड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. या प्रकरणात कारवाई करण्याऐवजी माझ्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असेही या पीडित महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितले.

त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा : मुंडे

दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे या पीडित महिलेच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. या प्रकरणात पीडितेवर अन्याय करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हनी ट्रॅप करतात पण मन भरलं की त्यांना या गोष्टी ट्रॅप वाटतात. महिलांवर असे हनीट्रॅपचे नाव दिले जाऊ शकत नाही. मागील सहा महिन्यांपासून ही महिला न्याय मिळावा म्हणून फिरत आहे. तुरुंगातही कैदी महिलांवर अत्याचार होत असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा करुणा मुंडे यांनी केला.

या महिलेवर दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला. तिने तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण उलट तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इतकंच नाही तर तिच्या मुलींनाही त्रास दिला जात आहे. महिलांनाच जर न्याय मिळत नसेल तर हा कायद्याचा खेळ झाला आहे का? असा संतप्त सवाल करुणा मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत केला.

धक्कादायक! चक्क पोलिसांनी आरोपीकडूनच घेतली दीड कोटींची खंडणी; गुन्हे शाखेचे चार कर्मचारी निलंबित

follow us