उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिवस’ म्हणून घोषित करा, नितेश राणेंची यूनोकडे मागणी

Nitesh Rane on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 20 जून 2022 रोजी शिवसेनेत बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. हा दिवस ‘गद्दार दिन’ म्हणून घोषित करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या पत्राला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले […]

Nitesh Rane

Nitesh Rane

Nitesh Rane on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 20 जून 2022 रोजी शिवसेनेत बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. हा दिवस ‘गद्दार दिन’ म्हणून घोषित करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या पत्राला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा, अशी मागणी राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा जन्म झाला. तो दिवस देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. माझी अपेक्षा आहे की ते याची दखल घेतील, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशासोबत, धर्मासोबत, वडिलांच्या विचारासोबत गद्दारी केली आहे. ज्या भाजपने 25 वर्षे युतीच्या नावाने सांभाळले, मोठे केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मोठ्या भावाप्रमाणे सांभाळले होते. त्यांच्यासोबत क्षणाक्षणाला गद्दारी केली आहे. अशा उद्धव ठाकरेंचा जन्म दिवस 27 जुलैला देशद्रोही दिवस जाहीर केला पाहिजे अशी विनंती संयुक्त राष्ट्राकडे केली आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रतिबंध करण्यात आला आहे. (Thackeray Group) तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. शिंदे गटाची शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे.

Exit mobile version