मुंबई : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या (Rasikashray Sanstha) माध्यमातून वृद्ध, कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. ‘या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला अधिक काम करण्याची उर्जा देत राहील’, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, ”तुम्ही म्हणालात, ‘मुंबई तर पाहिलीच, पण तुम्हाला फक्त टीव्ही आणि पेपरात पाहतो, तुमची भेट होईल, याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती! ‘
पण खरं सांगू मला तुम्हाला भेटून अधिक आनंद झाला, आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली.
हे देखील वाचा
Letsupp Survey : 81 टक्के लोकांच्या मते शिवसेना ठाकरेंचीच; शिंदेंसाठी धक्का
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध, कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.”
या उपक्रमाचे कौतुक करताना फडणवीस म्हणतात, ”आयुष्यात कधीही घराच्या बाहेर न पडलेल्या या बांधवांना मुंबई दाखण्याचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे.
कुणी वॉचमनचे काम करतो, तर कुणी शेतीत काम, भाजीपाला विक्री, रांगोळी व्यवसाय, धुणीभांडी अशी कामे करणारे आहेत. त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारताना गावात हरविल्यासारखे झाले. मुंबादेवी, ताज हॉटेल, सिद्धिविनायकाचे दर्शन झाले.”
‘समुद्र पाहिला…. एकेक करीत प्रत्येक जण आपले अनुभव कथन करीत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला अधिक काळ काम करण्याची ऊर्जा देत राहील.
हा उपक्रम आयोजित करणारे महेश पवार आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.