मुंबई :उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चात सहभागही झालेल्या एक महिला पदाधिकाऱ्यांचा मृत्य झाला आहे. युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले -शिंदे (Durga Shinde ) असे मृत्यू झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने कार्यकर्त्यांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. युवासेनेच्या रणरागिणी म्हणून त्या सर्वत्र परिचित होत्या.
युवासेना कार्यकारिणी सदस्या सौ.दुर्गाताई भोसले – शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन🙏🏻
शिवसेनेची रणरागिणी आपल्या लाडक्या दुर्गा ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏
— Adv.Pankaj Gore🎓🚩 (@AdvPankajGore) April 5, 2023
शिवसेना युवासेना परिवाराच्या एक हरहुन्नरी कर्तुत्वान महिला रणरागिनी दुर्गा शिंदे यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे ठाण्यात निघालेल्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत त्या सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या. मात्र याचदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना काही त्रास जाणवू लागला होता. ही बाब समजताच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने विश्रांती आणि उपचारासाठी मुंबईला पाठवले.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना
मात्र बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे, पती, आई आणि वडील केशवराव भोसले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान त्यांची अंतयात्रा त्यांच्या राहत्या घरातून म्हणजेच कंबाला हिल, मुंबई येथून आज सायंकाळी ०५ वाजता निघणार आहे. त्यांच्यावर बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे अंतसंस्कार होणार आहे.