ईडीची धाड वेगळ्या कारण्यासाठी; जयंत पाटलांचा आरोप

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने […]

Jawant Patil

Jawant Patil

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यात काही सापडले नाही. ईडीची धाड वेगळ्या कारण्यासाठी आहे. ते या सरकारला कायम विरोध करतात. त्यांच्या विरोधामुळे सरकारने त्यांच्याविरोधात सर्व एजन्सींच्या गैरवापर केला जात आहे.

आता नव्याने छापेमारी सुरू करून एखाद्याच्या मागे सरकार कसं लागत आहे ?, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. सतत कारवाई करणे आणि एखाद्याला बदनाम करणे, कारण तो राजकीयदृष्ट्या तुमच्याविरोधात वेगळी मते मांडतो. सत्ताधाऱ्यांकडून एजन्सींचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

Exit mobile version