Download App

ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्यावर ही कारवाई असेल; मुंबईतील ईडी धाडीवर फडणवीसांचे थेट भाष्य

Devendra Fadavis On ED Raid :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकी काय कारवाई चाललेली आहे, याची मला माहिती नाही. पण ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेत कोविड सेंटर सुरु करण्यात आले आणि त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला होता. तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती समोर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या अचानक तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरु झाले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. पुण्यामध्ये तर एक पत्रकाराचाच त्यात मृत्यू झाला. या छाप्यामध्ये काय मिळेल हे ईडी सांगू शकेल मी याबाबत सांगू शकत नाही. तसेच ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असेल, असे फडणवीस म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते युवासेनेचे पदाधिकारीदेखील आहेत. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्याच हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहाराची कॅगच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा केली होती. आता जवळपास साडे बारा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोल आली आहे. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us