Download App

ईडीचे धाडसत्र! दादरमधील प्रसिध्द साडीचे दुकान भरतक्षेत्रवर छापा, इतर पाच ठिकाणीही झाडाझडती

  • Written By: Last Updated:

Mumbai ED Raid : अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. ईडीचं मुंबईत एकाच वेळी 5 ते 6 ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. मुंबईतील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर (Bharatkshetra Saree Shop) ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळी काही अधिकाऱ्यांनी येऊन शोधमोहीम राबविल्याची माहिती आहे. ईडीच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत अद्याप ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ICC T20 Rankings : ICC च्या 12 पैकी 8 रॅकिंग्समध्ये भारताचा दबदबा; रवि बिश्नोई बनला नंबर नव गोलंदाज 

दादरमधील प्रसिद्ध साडीचे दुकान भरतक्षेवर ईडीने धाड टाकली. ईडीच्या छाप्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ईडीचे अधिकारी गेल्या 5 तासांपासून दुकानात असून कारवाई सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला.

Chhagan Bhujbal : ..तर मराठा शिल्लक राहणार नाही, सगळेच कुणबी होतील; भुजबळांनी कारणही सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार, भरतक्षेत्र हे अनेक वर्षांपासून साडी व्यवसायाचे प्रसिद्ध दुकान आहे. या दुकानाच्या अनेक ठिकाणी शाखाही आहेत. अशातच ईडीच्या 20 ते 25 अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 7 ते 8 दरम्यान या दुकानावर छापा टाकला. दादरच्या गजबजलेल्या परिसरात हे दुकान असल्याने आजूबाजूच्या परिसरात ही छापेमारी चर्चेचा विषय बनली. सध्या ईडीचे अधिकारी दुकानात कागदपत्रे तपासत आहेत. भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला यांचीही चौकशी करण्यात येत आहे. ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मनसुख गाला यांच्या घरीही पोहोचले आहेत. ईडी अधिकाऱ्यांकडून दादरमधील त्रिशाला बिल्डिंगच्या गाला यांच्या 4 फ्लॅटचीही चौकशी केली जात आहे.

भरतक्षेत्र दुकानासह ईडीने पाच ठिकाणी कारवाई केली. भोईवाडा पोलीस ठाण्यात 2019 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने ईसीआयआर नोंदवला असून उद्योगपती दिनेश शहा यांनी त्यांच्या सीए आणि पार्टनर यांच्या निवासस्थानाही छापेमारी केली.

Tags

follow us