Download App

“..तरच मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार”; सदा सरवणकरांनी नेमकं काय सांगितलं ?

मनसेने जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे हे उमेदवार मनसेने मागे घ्यावेत.

Mumbai News : महायुतीत माहीम मतदारसंघावरून (Mumbai News) चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. भाजपने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने येथे थेट सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेऊन या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. तरी देखील सरवणकर उमेदवारीवर ठाम होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही उमेदवारी मागे न घेण्याचे संकेत दिले होते. या घडामोडींनंतर आता पुन्हा सरवणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी काही अटींवर उमेदवारी मागे घेऊ असे सांगितले. मात्र या अटी मनसेकडून पूर्ण होतील याची काहीच शक्यता दिसत नाही.

माहीमचा तिढा वाढला! CM शिंदेंशी चर्चेनंतरही सरवणकर ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं?

माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेणार का असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातोय. मात्र मी निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा आहे. मनसेने जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे हे उमेदवार मनसेने मागे घ्यावेत. त्यानंतरच मी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. पक्षासाठी त्याग करण्यास मी तयार आहे.

सरवणकरांना विधानपरिषदेची ऑफर

यानंतर महायुतीने शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांना एक खास ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणार आहे. मात्र या ऑफरवर सदा सरवणकर यांचा काय प्रतिसाद राहिला याची माहिती मिळालेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात सदा सरवरणकर काय निर्णय घेतात. खरंच उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“मी त्याच वेळी राज ठाकरेंना विचारलं होतं” ‘माहीम’च्या तिढ्यावर CM शिंदे स्पष्टच बोलले..

एकनाथ शिंदे काय म्हणाले

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आमच्याबरोबर होते. माझी त्यांच्याशी चर्चाही झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी तुमची रणनीती काय असेल असे मी त्यांना विचारलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की आधी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ द्या. नंतर आपण बोलू या. पण नंतर त्यांनी थेट उमेदवारच जाहीर करण्यास सुरुवात केली.

मागील दोन ते तीन टर्मपासून आमचा तेथे आमदार आहे. सरवणकर आमचे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास अतिशय आग्रही आहेत. आम्हालाही कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचं मनोबल खचणार नाही याची काळजी घेणं नेत्यांचं काम असतं असे एकनाथ शिंदे काल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.

follow us