नांदेडमध्ये औषधांचा तुटवडा नव्हता, चौकशी करून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Nanded Hospital Death : नांदेडमधील घटनेची (Nanded Hospital Death) आणि मृत्यूची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती दिली आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये काहींची माहिती मिळाली आहे. त्यानुसार काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हार्टचा […]

Eknath Shinde Kol

Eknath Shinde Kol

Nanded Hospital Death : नांदेडमधील घटनेची (Nanded Hospital Death) आणि मृत्यूची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती दिली आहे.

प्राथमिक रिपोर्टमध्ये काहींची माहिती मिळाली आहे. त्यानुसार काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हार्टचा त्रास होता. एक अपघात होता. काही बालकं कमी दिवसांत जन्मलेली होती. वजनाने कमी होती. मात्र अहवालातून संपूर्ण माहिती समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढं म्हणाले की नांदेडमधील घटनेवर आज मंत्रिमंडळात चर्चा झाली. या घटनेची चौकशी सुरु आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते.

नांदेड दुर्घटना! ‘डीनला तत्काळ निलंबित करा’; विजय वडेट्टीवारांनी काढले वाभाडे

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

Letsupp Special : औषध खरेदीचा घोळ; संचालक पदही रिक्त; राज्यात आरोग्य सेवेचा बोजवारा

केंद्राने अहवाल मागवला
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. भारती पवार म्हणाल्या की नांदेड मधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी एॅडमिट झाले होते? ही माहिती मागवण्यात आली आहे. नांदेडसह संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूची दखल केंद्राकडून घेण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version