Download App

फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता; CM शिंदेंनी उघडं पाडलं MVA चं पितळ

  • Written By: Last Updated:

मुंबई  : फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारमधील पितळ उघडे करत गौप्यस्फोट केला आहे. खोट्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडकवून त्यांना तुरूंगात टाकण्याचा डाव होता, असे खुलासा करताना म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पैसेच नाहीत! मराठवाड्यातील भाजप आमदाराने परत केले म्हाडाचे घर

शिंदे म्हणाले की, फडणवीसांनादेखील जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न झाला होता. मविआ सरकराच्या काळात यंत्रणेचा दुरुपयोग झाला होता. ही वस्तूस्थिती आहे. मला देखील काही गोष्टी माहित आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अडकावयचं आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता असे ते म्हणाले.

फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता; CM शिंदेंनी उघडं पाडलं MVA चं पितळं

एसआयडी ऑफिसमधील कंप्युटर हॅक झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडे ही माहिती गेली होती, असा दावा सीबीआयचा होता. त्यामुळे तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्लांना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे फडणवीस यांना दिलासा दिला आहे.

यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलले आहेत. शिंदे म्हणाले, त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा, अभिनेत्री कंगना राणावत, नारायण राणे या सर्वांवर खोटे आरोप लावले होते. त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न तत्कालीन ठाकरे सरकारने केला होता, असा गौप्यस्फोट शिंदेंनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी यंत्रणेचा दुरुपयोग झाला होता. ही वस्तुस्थिती आहे. मला देखील काही गोष्टी माहित आहेत. देवेंद्र फडणवीसांना अडकवायचं आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज