खारघरमधील मृत्यूनंतरही ठाण्यात दुपारी १२ वाजता सरकारी कार्यक्रम; जितेंद्र आव्हाड संतापले

Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले.

यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. यातच आता पुन्हा एकदा सरकरकडून दुपारी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.

…तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, आज त्याच हाताने गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिला पक्षात प्रवेश

 

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “खारघर प्रकरणातून शासनाने काही शहाणपण शिकल्यासारखं वाटत नाही. ठाणे येथिल जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन हे भरदुपारी 12.00 वाजता ठेवण्यात आलेले आहे. शासन निर्णय १२ ते ४ ह्या वेळेत कार्येक्रम घेऊ नये. आता ह्यावर मी अधिक काही लिहू इच्छित नाही.”

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

वेळेसाठी नवा शासन निर्णय पण…

सर्वच बाजूने टीका होत असल्यामुळे अखेर राज्य शासन यावर निर्णय घेणार आहे. राज्यात पुढील काळात जोपर्यंत उन्हाचे दिवस आहेत. तोपर्यंत १२ ते ५ या वेळेत एकही कार्यक्रम खुल्या मैदानात होणार नाहीत. यासाठी राज्य सरकार नवीन शासन निर्णय घेणार आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली होती. पण तरीही पुन्हा एकदा सरकारकडून दुपारी कार्यक्रम आयोजित केला आहे.

Exit mobile version