मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्यावर धक्के बसत आहेत. अशात मातोश्रीचे अत्यंत विश्वासू आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना ठाकरे गटाने सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हाध्यक्ष पदावरुन दूर केले आहे. वैभव नाईक यांची शिंदे गटाशी जवळीक वाढल्याने त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन दूर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर आता आमदार वैभव नाईक यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
वैभव नाईक म्हणाले, गेल्या पंधारा वर्षापासून मी जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होतो. दोन आमदार आणि एक खासदार निवडून येण्यासाठी मी प्रयत्न केले होते. त्यामध्ये मला यश देखील आले होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. सहा महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती की आता माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्यांना त्या पदावर संधी द्यावी, असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
Sanjay Kakade : फक्त १०० फोन आणि मी लोकसभा जिंकणार, काकडेंनी सांगितला जिकंण्याचा प्लॅन
वैभव नाईक पुढं म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी माझी विनंती मान्य केली आहे. आमच्या जिल्ह्यात तीन जिल्हा प्रमुख नेमले आहेत. माझ्यावर उद्धव ठाकरेंचा विश्वास आहे. अनेक अश्ववासनं आली, अमिषं दाखवली पण आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. मी दुसऱ्या गटात जाणार अशी आमच्या विरोधकांनी अफवा पसरवली आहे. त्यांना माझी किती गरज आहे हे दिसून येत पण मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे. यावर चर्चेवर ते म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरुन त्यांना माझ्याशी जवळीक वाढवायची असावी किंवा मला बदनाम करायचं असावं. पण जिल्हाध्यक्ष निवडताना माझ्याच नेतृत्वाखाली बैठक झाली. माझ्या सुचनेनुसार तिन्ही नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे नाराज नाही, असेही त्यांनी सांगितले.