Download App

आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेंनी कट कसा रचला ?

  • Written By: Last Updated:

Sameer Wankhede Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व त्याचे मित्र यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकून पकडले होते. त्यातून एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. पुढे आर्यन खानला एनसीबीने (नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो) NCB ने क्लीनचिट दिली. तर चौकशीत समीर वानखेडे हे अडकत गेले. त्यानंतर सीबीआयने थेट त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. आता समीर वानखेडे यांनी तथाकथीत पंचाच्या मदतीने आर्यन खानकडून खंडणी उकळण्यासाठी कसा कट रचला होता ते समोर आले आहे.

गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण

2 ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीने रेड मारली होती. त्या क्रुजवर रेव पार्टी सुरू होती, असा दावा एनसीबीचा होता. आर्यन खानसह 19 लोकांना अटक करण्यात आली होती. आता या केसमध्ये एक आरोपी सोडून सर्वांना जामिन मिळालेला आहे. आर्यन खान हा तीन आठवडे जेलमध्ये होता. त्यानंतर एसआयटीच्या चौकशीनंतर 2 नोव्हेंबरला त्याला जामिनही मिळाला. त्यानंतर गेल्या वर्षी 27 मे रोजी एनसीबीने चार्जशीट न्यायालयात दाखल केले होते. त्यात आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले.

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एसआयटी स्थापन

आर्यन खानला वगळता इतर आरोपींकडून नशाचे पदार्थ मिळाले होते. त्याप्रकरणी १४ जणांविरुद्ध एनडीपीएसच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप पंच प्रभाकर साईल याने केला होता. साईल हा गोसावीचा गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. प्रभाकरने प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. प्रभाकर यांच्या दाव्यानुसार के. पी. गेसावी त्यात सहभागी होता. या आरोपानंतर एनसीबीने दक्षता विशेष तपास पथकाची (एसआयटीची) स्थापना केली. पण एप्रिल 2022 मध्ये पंच साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

सीबीआयची इंट्री
‘एनसीबी’च्या दक्षता समितीने याबाबत केलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यानंतर सीबीआयकडे तक्रार केली होती. या प्रकरणात वानखेडे, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात वानखेडेने आर्यन खानला अडकवून पंचवीस कोटीच्या खंडणीसाठी कट कसा रचला हे समोर आले आहे.

गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे भासवले !
वानखेडे यांच्या आदेशानुसारच के. पी. गोसावी हा आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता. त्यासाठी एनसीबीचे नियम तोडण्यात आले होते. त्यावेळी गोसावीने आर्यन खानबरोबर सेल्फी काढला होता. हा सेल्फी व्हायरल झाला होता. आपल्या मित्रांना दाखविण्यासाठी हा सेल्फी घेतल्याचे गोसावी यांनी म्हटले होते. के. पी. गोसावीला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि एनसीबी कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले होते. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्यासारखा वागत होता, असे सीबीआयने गुन्ह्यात म्हटले आहे.

Aryan Khan Case: नवऱ्यावर गंभीर आरोप होताच; क्रांती रेडकर मैदानात, म्हणाली….

गोसावी, डिसुझांचे वानखेडेसाठी काम
गोसावी आणि त्याचा साथीदार सॅनव्हिले डिसोझा यांनी आर्यन खानचा कुटुंबाकडून म्हणजे शाहरुख खान कडून 25 कोटींची खंडणी घ्यायची होती. हे दोघे समीर वानखेडेंसाठी काम करत होते, असे सीबीआयने गुन्ह्यात म्हटले आहे. गोसावी याला एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे.

Tags

follow us