साहिल वाकोडे प्रकरणानंतर IIT मुंबईचा निर्णय; सिलिंग फॅन हटवणार, वॉल-माऊंटेड फॅन बसवणार

IIT Bombay: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने IIT बॉम्बेमध्ये सिलिंग फॅन हटवून वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याचा निर्णय घेतला.

IIT Bombay Ceiling Fan Decision

IIT Bombay Ceiling Fan Decision

IIT Bombay Removes Ceiling Fans After Sahil Wakode Incident: मुंबईतील आयआयटी (IIT) मध्ये साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेतील सिलिंग फॅन काढून त्याऐवजी वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसह संबंधित ठिकाणी असलेल्या सिलिंग फॅनऐवजी भिंतीवरील फॅन बसवण्याची योजना आहे.

राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबईच्या प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर सिलिंग फॅनऐवजी वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

फॅन बसवण्यामागची पार्श्वभूमी काय?

मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याने त्याचं जीवन संपवलं. साहिल हा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. शुक्रवारी (18 सप्टेंबर) त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करताना तो पकडला गेल्याच्या काही तासांनंतर ही घटना घडल्याचे समोर आले होते.

आयआयटी बॉम्बेने या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले की, परीक्षेदरम्यान साहिलने प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असा दावा आयआयटी बॉम्बेने केला आहे. परीक्षेतील या प्रकाराबाबत संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, अशी त्याला खात्री देण्यात आली होती, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

चॅटजीपीटी वापरताना पकडला; IIT विद्यार्थ्याने संपवलं जीवन, विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन!

मात्र, साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.

साहिलच्या वडिलांनी गेल्या तीन महिन्यांपासून मुलाचा मानसिक छळ करण्यात आल्याचा तसेच जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. ज्या परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल वापरताना पकडला गेला, त्या परीक्षेचे पर्यवेक्षण प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला करत होते. संचालक शिरीष बी. केदारे यांच्या सांगण्यावरून दुल्ला यांनी साहिलला जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

आयआयटी विद्यार्थी मृत्यूप्रकरणी अखेर प्राध्यापकांचं निलंबन! गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी कारवाई

दरम्यान,या प्रकरणात अखेर मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी या प्रकरणी या प्राध्यापकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे आयआयटीमध्ये घडणाऱ्या अशा घटनांमुळे आयआयटी प्रशासनाने सिलिंग फॅन काढून वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Exit mobile version