Download App

काँग्रेसचा एकला चलो; लोकसभेच्या जागावाटपावर मुंबईत स्वतंत्र बैठक

Congress meeting in Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि मित्रपक्षांसोबतच्या जागा वाटपावर महाराष्ट्र काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला तसेच येत्या 6 तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या वाटपाबाबत पावसाळी अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सद्य परिस्थितीवर बैठकीत चर्चा करताना कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा करण्यात आली. पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. महिला, मुलींवरील हल्ले, लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली असून महिलांसाठी सुरक्षित असलेले मुंबई शहर व महाराष्ट्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बिहार उत्तरप्रदेशसारखे जंगलराज झाले असल्याची जनतेची भावना झाली आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही पण काँग्रेस पक्ष मात्र गंभीर आहे. काँग्रेसने राज्यपाल व पोलीस महासंचालक यांना भेटून यासंदर्भात अवगत केले आहे पण त्यात सुधारणा झालेला नाही. वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल असेही नाना पटोले म्हणाले.

मोदींच्या आरोपांवर पवारांचा खास पुणेरी टोमणा; म्हणाले, पंतप्रधानांनी…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आजच्या बैठकीत १५ ते २० जागांवर चर्चा झाली आहे, अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. पुढील बैठक ६ तारखेला होईल. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे, महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे, हे आम्ही नाकारत नाही.

जिल्हा विभाजनावर न बोलले चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !

चव्हाण म्हणाले की, सध्या ते कोणत्याही बैठकीत भाजप विरोधात भूमिका घेत नाहीत. पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले होते यावरून ते कोणाची B टीम आहेत हे स्पष्ट होते. ऐन निवडणुकांआधी हे सगळे सुरू झालं आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे उपस्थित होते.

Tags

follow us