Download App

मोदी जॅकेटनंतर आता मोदीहार समोर; अभिनेत्री रुची गुर्जरने गळ्यात घातला पंतप्रधान मोदींचा फोटो नेकलेस

रुचीने तिच्या नेकलेससह मॅचिंग होणारे कानातले, मांग टिक्का आणि पारंपारिक बांगड्या घातल्या होत्या. मात्र तिनं घातलेल्या

Actress Ruchi Gurjar : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये भारतीय अभिनेत्री रुची गुर्जर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. रेड कार्पेटवर उतरलेल्या रुचीनं तिच्या अनोख्या फॅशन स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Gurjar) तिनं आपल्या गळ्यात घातलेल्या नेकलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष तिच्याकडं आकर्षित झालं होतं.

तिच्या नेकलेसबद्दल बोलताना रुची गुर्जर म्हणाली, हा नेकलेस कुठल्याही दागिन्याहून मोलाचा आहे. हा नेकलेस म्हणजे जागतिक स्तरावरील भारताच्या सामर्थ्याचं, दूरदृष्टीचं आणि विकासाचं प्रतीक आहे. कान्समध्ये हा नेकलेस परिधान करून, मला नेतृत्व करुन भारताला नव्या उंचीवर नेणाऱ्या आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता.

परिधान केलेला नेकलेस पारंपारिक राजस्थानी डिझाईन्सनं सजवलेला होता आणि पंतप्रधान मोदींच्या सिग्नेचर स्टाईलनं प्रेरित होता. रुचीचा पोशाख रूपा शर्माने डिझाइन केला होता. आरशाचे काम, गोटा पट्टी आणि भरतकामानं सजवलेला सोनेरी लेहेंगा पारंपारिक राजस्थानी सौंदर्य आधुनिक पद्धतीनं सादर करत होता.

आता राजूच म्हणतो, ये बाबुराव मेरा पैसा दे ! अक्षयकुमार, परेश रावलमध्ये कशावरून वाजलं ?

तिच्या लेहेंग्यासह, रुचीनं जरीबारीच्या डिझायनर रामनं डिझाइन केलेला बांधणी दुपट्टा घातला होता. हे राजस्थानी कापड भारतीय संस्कृतीच्या परंपरा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक होतं. रुची पुढं म्हणाली, “हा दुपट्टा घालणे म्हणजे राजस्थानच्या आत्म्याला आलिंगन दिल्यासारखं होतं.”

रुचीने तिच्या नेकलेससह मॅचिंग होणारे कानातले, मांग टिक्का आणि पारंपारिक बांगड्या घातल्या होत्या. मात्र तिनं घातलेल्या पंतप्रधानंच्या फोटो असलेला नेकलेस आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. रुची म्हणाली, “पंतप्रधान मोदींनी भारताची जागतिक प्रतिमा पुन्हा परिभाषित केली आहे. मला तो अभिमान माझ्याबरोबर घेऊन जायचा होता आणि हा नेकलेस त्यांच्या नेतृत्वाबद्दल असलेला माझा आदर होता.”

रुची गुर्जर कान्समध्ये एक सांस्कृतिक आयकॉन म्हणून सामील झाली आहे. तिनं भारतीय परंपरेच्या सौंदर्याचं दर्शन देत भारताच्या विकासाचा जागतिक चेहरा बनलेल्या नेत्याचा सन्मान केला. शेवटी ती म्हणाली, “कान्समध्ये राजस्थान आणि भारताचं प्रतिनिधित्व करणं हा फक्त एक क्षण नाही, तर आपण कोण आहोत हे जगाला सांगण्यासाठीचा हा एक संदेश आहे.

follow us

संबंधित बातम्या