Download App

आयएससी बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेत ठाण्याची इप्शिता देशात पहिली

ICSE, ISC results 2023: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE)ने आज 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. 13 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयएससी (12वी) परीक्षा घेण्यात आली होती. या वर्षी पाच विद्यार्थ्यांनी 12 वी मध्ये पहिला रँक मिळवला आहे. यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. यामध्ये ठाण्याच्या इश्पिता भट्टाचार्यने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

इश्पिता भट्टाचार्यने देशात प्रथम क्रमांक मिळवत ठाण्याची मान देशात उंचावली आहे. ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याची कन्या इश्पिता भट्टाचार्य देशात पहिली आली आहे. तिला 99.75 टक्के गुण मिळाले आहेत. ठाण्यातील सुलोचनदेवी सिंघानिया शाळेची ती विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी तिचं कौतुक केलं आहे. शिवाय सर्वांकडून इश्पितावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जचे कोलकातासमोर 145 धावांचे लक्ष्य, शिवम दुबेचे अर्धशतक हुकले

ISC वर्ग 12 वी चा निकाल: टॉपर्स यादी
इश्पिता भट्टाचार्य – 99.75 टक्के
रिया अग्रवाल – 99.75 टक्के
मोहम्मद आर्यन तारिक – 99.75 टक्के
शुभमकुमार अग्रवाल – 99.75 टक्के
मन्या गुप्ता – 99.75 टक्के

या वर्षी ICSE इयत्ता 10वीच्या अंतिम परीक्षेत एकूण 1,28,131 मुले आणि 1,09,500 मुली बसल्या होत्या. त्यापैकी 1,26,474 मुले आणि 1,08,640 मुली उत्तीर्ण झाल्या असून एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 98.94% आहे. ISC किंवा 12वीच्या परीक्षेत बसलेल्या एकूण मुलांची संख्या 51,781 आहे आणि एकूण मुलींची संख्या 46,724 आहे. त्यापैकी 49,687 मुले आणि 45,796 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 96.93% आहे. दोन्ही वर्गात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.

Tags

follow us