Download App

राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू नका; जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

  • Written By: Last Updated:

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या अधिवेशनात आक्रमक होऊन बोलत आहेत. ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार जुंपली आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विजेसंदर्भातील टोरंटो कंपनीसंबंधित मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. टोरंटो प्रकरणी उगाच राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू नका, असा शब्दात आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

टोरंटे कंपनीला कंत्राट कसे मिळाले याबाबत आव्हाड यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे बोट दाखविले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना एक जाहिरात काढली होती. त्यावेळी टोरंटो कंपनीला कंत्राट दिले होते. त्यावेळी फडणवीस यांनी मला विरोध करू नका. मुंब्रात विजेबाबत आधीच गोंधळ आहे, असे सांगितले होते.
MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; राज्य सरकारने केला मोठा अडथळा दूर

आता मात्र टोरंटोचा मालक मी आहे, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. या सर्वांमागे एक पार्टी आहे. ती संभाजीनगरमध्ये आंदोलन करत आहे. ती पार्टी माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी पैसे पुरवत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

विक्रम काळे पायऱ्यांवर घोषणा देत होते, केसरकर आले आणि काळेंना सुनावून गेले, काय घडलं वाचा

टोरंटो हटविण्यासाठी उपोषण केले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. त्यांना चढविण्यापेक्षा स्वतः टोरंटोला हटवा. राजकारण करून वातावरण खराब करू नका. मुंब्रात करोडी रुपये ओतले तरी काही खेळ होणार आहे. टोरंटोच्या समस्या तुम्ही सोडवा. त्याला राजकीय पिना मारून ते पाप माझ्या गळ्यात घालू नका, असा टोलाही आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लगावल्या आहेत.

टोरंटो कुणी आणले आहे. हे सर्वांना माहीत आहे. या समस्या सोडवा, राजकारणासाठी वाव राहणार नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील अनेक प्रश्नावरून मुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार संघर्ष होत आहे. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Tags

follow us