Download App

‘सोनिया अन् राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का?’ सोमय्यांचा खोचक सवाल

Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्यानंतर या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली होती. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले नाही. यावरून राऊतांनी आगपाखड केली होती. राम मंदिरासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. उद्धव ठाकरे तिकडे गेले तर शिवसेनेचा जयजयकार होईल, म्हणून आमंत्रण देणार नाहीत, असे राऊत म्हणाले होते.

Sanjay Raut : पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण भोवलं; राऊतांविरोधात गुन्हा दाखल

संजय राऊत स्वतःची मिमिक्री उद्धव ठाकरेंवर करतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवी वस्त्र परिधान केली. सोनिया गांधींचा जयजयकार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देण्याचं काम केलं. त्यामुळे या राहुल आणि सोनिया गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का, असा सवाल सोमय्या यांनी केला. स्वतःची चेष्टा करून घेण्याची सवय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना आहे.

Tags

follow us