किरीट सोमय्यांना अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, 50 लाखांच्या खंडणीची मागणी

Kirit Somaiya : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबत 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी […]

Kirit Somaiya

Kirit Somaiya

Kirit Somaiya : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबत 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नवघर पोलिनसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.

सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी त्यांच्या कार्यालयातील मेल अकाउंट तपासात असताना त्यावर ऋषिकेश शुक्ला नावाच्या ईमेल आयडीवरुन 50 लाखांची मागणी करणारा मेल आल्याचे दिसून आले. एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मेलमध्ये आधीचा व्हिडिओ हा फक्त ट्रेलर असून पिक्चर बाकी असल्याचेही म्हंटले आहे. आरोपीने वृत्त वाहिनीवर प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या आधारेच त्यांना धमकावलेले दिसून आले.

भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच AIADMK चा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय…

दरम्यान, सोमय्या यांच्या संदर्भातील अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर वृत्तवाहिनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर हाय कोर्टाने प्रसरणावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले होते. आता सोमय्या यांनाच खंडणीसाठी ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. नवघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून सायबर पोलीसही याबाबत समांतर तपास करत आहेत.

Exit mobile version