Download App

किशोरी पेडणेकरांवर आर्थिक गुन्हे शाखेची वक्रदृष्टी, कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी बजावले समन्स

  • Written By: Last Updated:

Kishori Pednekar : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scams) आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकरांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. ( Kishori Pednekar has been summoned by the Financial Crimes Branch in the case of the Covid Body Bag Scam)

5 ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध कलम ४२० आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना अंतरिम दिलासा दिला आहे. 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

आता ईडीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ईडीच्या अधिकार्‍यांनी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याची प्रत तसेच आनुषंगिक कागदपत्रे मागितल्याची माहिती आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची चौफेर कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

निविदा प्रक्रियेत घोटाळा
बीएमसीत कोरोनाच्या काळात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. कोविड काळात निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असून तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे. तेव्हा किशोरी पेडणेकर ह्या महापौर होत्या. त्यामुळं त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2000 रुपयांऐवजी 6,800 रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे.

Tags

follow us