मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सु्प्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली शिंदे-ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच ठाकरे नाव नसलेली व्यक्ती शिवसेना (ShivSena) प्रमुख झाली आहे.
या प्रकरणावर लेट्सअपने एक सर्वे घेतला. त्यामध्ये ‘तुम्ही कोणाला शिवसेना म्हणणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्वेमध्ये 24 फेब्रुवारी सायंकाळी चार पर्यंत 49 हजार जणांनी आपले मत नोंदवले. त्यातील 81 टक्के जणांनी उद्धव ठाकरे यांच्या गटालाच आम्ही शिवसेना म्हणून ओळख देणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. 19 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे. हा सर्वे लेट्सअपच्या यूट्यूब कम्युनिटीवर करण्यात आला. 23 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यानच्या 24 तासांत 49 हजार लोकांनी मते नोंदवली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती. तर लोकसभेतील पंधरा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. लेट्सअप मराठीने केलेल्या सर्वेतील एक व्यक्ती म्हणतो, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच जनतेच्या भावना आणि मत आहे.’ तर दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘दाढी वाढवली म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. धनुष्यबाण घेतला म्हणून कोणी उध्दव ठाकरे होत नाही.’ अशी प्रतिक्रिया आहे.
‘शरद पवारांच्या मांडीत बसून हिंदुत्व कसं? सावरकरांना विसरून हिंदुत्व कसं? हिंदुहृदयसम्राट शब्द सोडून, जनाब बाळासाहेब झाल्यावर हिंदुत्व कसं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांना एका व्यक्तीने केला आहे. त्यावर दुसरा व्यक्ती लिहितो, ‘एकनाथ तो चोर है भाई…..सब चोरी से किया उसने….वो शिवसेना का होता तो शेर की तरह लड़ता….चोरी नहीं करता….’
यामध्ये काहींनी कोर्टाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणतो, ‘कोर्टाला सगळं माहित असून पण ते न्याय देणार नाही. पण जनता न्याय देईल.’ यावर दुसऱ्या व्यक्तीने घराणेशाहीबद्दल त्याचे मत मांडले आहे. तो म्हणतो, ‘पक्ष वारसाहक्काने चालवायचा आणि म्हणायचं देशात लोकशाहीची हत्या होतेय. हा दुटप्पीपणाच नाही तर काय?’
एका व्यक्तीने एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील भविष्यावर भाष्य केले आहे. तो म्हणतो, ‘शिंदे साहेब यांची हवा फक्त 2024 ची निवडणूक होईपर्यत आहे. त्यानंतर त्यांना ठाणे सोडून कोणी ओळखणार नाही.’ दुसऱ्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघडीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणतो, ‘युतीला कौल असतांना मतदारांशी गद्दारी करुन जनतेन नाकारलेल्या काँग्रेससोबत जाणं हे लोकशाहीला धरुन होतं का?’
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर एक व्यक्ती म्हणतो, ‘आज तुम्ही राज्याचं नेतृ्त्व करत आहात ते नेतृ्त्व करण्याची संधी कोणामुळे मिळाली ते लक्षात असावं. जर तुम्ही म्हणत असाल मी बाळासाहेबाचे विचार पुढे नेत आहे पण गद्धार होऊन आणि बाळासाहेबांचे विचार दुसऱ्याच्या दावणीला बांधून हे नेतृत्व मान्य नाही.’ यावर दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘शिवसेना ही कोणा एकाच्या बापाची जाहागिरी होऊ शकत नाही. जो शिवरायांना मानतो, त्यांचे कर्तृत्व आणि विचार पुढे घेऊन जातो, असा प्रत्येक मावळा शिवसैनिक आहे. शिवसेना कोणाची तर शिवसैनिकांची आहे.’
एका व्यक्तीने वेगळी भूमिका मांडली. तो म्हणतो, ‘शिवसेना दोघांचीही नाही कारण शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला. पण स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे मात्र महिलांबाबत अपशब्द वापरत आहेत. त्यामुळे यांना शिवसेना हे नाव ठेवण्याचा काही एक अधिकार नाही.’ यावर दुसरा व्यक्ती म्हणतो, आपण तर आता मतदानच करणार नाही. आता आपला विश्वासच उडाला आहे आता.’
हे देखील वाचा
शरद पवारांची पुन्हा गुगली : राष्ट्रपती राजवट उठवण्याचं ते वाक्य म्हणे चेष्टेत
शिवसेना कोणाची यावर एक व्यक्ती म्हणतो, ‘कितीही शहाणपणा केलात तरी अधिकृतरित्या भारतात सर्वांनाच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या पक्षालाच शिवसेना म्हणावे लागणार आहे.’ यावर दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘उद्धवसाहेब पक्ष गेला, चिन्ह गेले तरी तुम्ही नवीन पक्ष काढा. शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत.’
‘शिंदेंना फक्त सीएम पद मिळाले पण त्यांनी त्यासाठी स्वत:चे आणि पक्षाचे भविष्य विस्काटले. शिंदे ऑलरेडी संपले आहेत फक्त त्यांच्या सीव्ही मध्ये सीएम म्हणून लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी ओळख आहे.’ असे एका व्यक्तीने म्हटले आहे. दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘अजून किती दिवस शरद पवारांची चमचेगिरी करणार? शरद पवार यांचा काही फायदा नाही. हिंदुत्वासाठी फक्त एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करणार आहे.’
‘एकनाथ शिंदे तुम्ही जे केले आहे ते बाळासाहेबांचे विचार नाही आहेत.’ अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. यावर दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘उद्धवची शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची शिवसेना आहे. खरी शिवसेना ही शिंदे शिवसेना.’
शिंदेंची सेना पळून काय जातात, कधी म्हणतात आम्ही मोदींची माणसं, कधी म्हणतात दिघेंची, केंव्हा म्हणता आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे. शब्दाला का पक्के नाहीत? वारंवार स्टेटमेंट बदलत आहेत. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची, जय महाराष्ट्र.’ अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केलीय तर दुसरा व्यक्ती म्हणतो, ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। फक्त एकनाथ शिंदे.’