Download App

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळेल झटपट! सरकारने आणलं खास मोबाइल अ‍ॅप

CM Relief Fund : संकटाच्या काळात पैसे जवळ नसताना सरकारी मदत मिळणे गरजेचे असते. पण सरकारची मदत मिळवायची म्हणजे मोठे दिव्यच. हजारो अर्ज भरा, चौकशा करा, तासनतास वाट पहा इतके सगळे केल्यानंतरही मदत मिळेल की नाही याची शाश्वती नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना या अडचणी सतत जाणवत असतात. आता या अडचणी काय आहेत हे सरकारच्याही कानावर गेल आहे. त्यामुळे सरकारने या प्रक्रियेत अमूलाग्र बदल करत झटपट मदत कशी मिळेल याचे नियोजन केले आहे.

स्वातंत्र्यदिनी फडणवीस गडचिरोलीत; इतिहासात पहिल्यांदाच शासन सिमेवरील पिपली बुरगीत

मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाइल अॅप आणि व्हॉट्सअॅप हेल्पलाइनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. दुर्धर आणि गंभीर आजारांवर मात केलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव विकास खारगे, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फ एक वर्ष एक महिन्यात साडेबारा हजार रुग्णांना याचा फायदा मिळाला. यासाठी शंभर कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती.

Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री बदलणार’ म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर…

आनंद मेळ्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी आणि उपचार देण्याच निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी असे कोणतेही घटक वैद्यकिय मदतीपासून वंचित राहणार नाहीत, असेही शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात वैद्यकिय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत रोखठोक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us