CM Eknath Shinde Speech : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवून प्रचार केला. खोटी वक्तव्ये केली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की खोट्याचं आयुष्य फार काळ नसतं. शेवटी सत्याचाच विजय झाला. मोदीजी तुम्ही हॅट्ट्रीक केली. पण विरोधक पेढे वाटत होते. मी म्हटलं तुम्ही शंभरच्या आत असतानाही पेढे वाटताय ठीक आहे. आज राज्यात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण विरोधकांचे चेहरे पडले आहेत. आता आपल्याला सुरक्षित, सुशोभित मुंबई घडवायची आहे.
त्यासाठी मोदींची (PM Narendra Modi) भक्कम साथ आपल्याला मिळेल. दोन वर्षात डबल इंजिन सरकारनं मोठं काम केलं. राज्याचा चेहरामोहरा बदलला. आता पुढल्या पाच वर्षात विकासाचं इंजिन आधिक वेगाने धावेल. या देशाला मोदींजींचं नेतृत्व सतत मिळत राहो. मोदीजी आज आम्ही सर्वजण आपल्याला शब्द देतो करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज पंतप्रधान मोदींना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; सुमारे 29 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत (Mumbai) आले होते. यावेळी त्यांनी 29 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रामदास आठवले, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवून प्रचार केला. खोटी वक्तव्ये केली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की खोट्याचं आयुष्य फार काळ नसतं. शेवटी सत्याचाच विजय झाला. नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. आता विधानसभा निवडणुकीत अधिक मेहनत घेऊन विजयी होऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
आरबीआयने आताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या अहवालात मागील तीन वर्षात देशात आठ कोटी रोजगार उपलब्ध झाल्याचे म्हटले आहे. यामुळे जे लोक खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत त्यांना जोरदार चपराक बसली आहे. या लोकांची प्रत्येक रणनीती आता देशासमोर येत आहे. त्यांची आता पोलखोल होऊ लागली आहे. एखादा रेल्वे ट्रॅक बनतो किंवा एखादा पूल बांधून तयार होतो त्यात कुणाला तरी रोजगार मिळतोच. पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत असून यातही अनेकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; मुलाच्या लग्नाचं दिलं आमंत्रण