Download App

“अशोकराव बिनशर्त भाजपात, त्यांची मदत कुठे घ्यायची मला चांगलं माहित”; फडणवीसांचा क्लिअर मेसेज

Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रातील दिग्गज नेते. अनेक विभागात मंत्री म्हणून काम केलं. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीही होते असे अशोक चव्हाण आज भाजपात आले आहेत. आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचा अनेक नेत्यांचा विचार असतो त्यातील अशोक चव्हाण आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आता काम करायचं आहे. अशोक चव्हाण यांनी बिनशर्त प्रवेश केला आहे. त्यांना कोणत्याही पदाची आवश्यकता नाही’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अशोक चव्हाण यांचे भाजपात स्वागत केले.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. अशोकराव आता भाजपात आले आहेत. त्यांची मदत कुठे आणि कधी घ्यायची याची आम्हाला चांगली माहिती आहे, असे फडणवीस म्हणाले.

Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच

फडणवीस म्हणाले, आणखीही काही नेत्यांबरोबर आमची चर्चा सुरू आहे. आमच्यासोबत कोणते नेते येतील हे आताच सांगता येत नाही. अशोक चव्हाण दोनचा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावर काय जबाबदारी द्यायची याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. विरोधी पक्षांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, त्यांना त्यांचे नेते सांभाळता येत नाहीत. इतकी वर्षे सोबत राहणारे नेते पक्ष का सोडून जात आहेत, असा सवाल करत आपले नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत याचं आत्मचिंतन काँग्रेसने करावे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट ?

राज्यसभा निवडणुकीत आता अशोक चव्हाण यांना भाजप उमेदवारी देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीस यांनी अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले मोठे नेते आहेत. निवडणुकांसाठी तिकीट वाटपाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेत असते. त्यामुळे हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल. त्यांची मदत कुठे घ्यायची हे मला चांगलं माहिती आहे, असे फडणवीस म्हणाले.

..म्हणूनच काँग्रेसला रामराम
काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं आहे. काँग्रेसमध्ये असतानाही अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं मला वाटलं म्हणून मी राजीनामा दिला आहे. त्यामागे असं दुसरं कोणतं कारण नाही. मला पक्षांतर्गत गोष्टींची जाहीर वाच्यता करायची नाही. कोणत्याही प्रकारची जुनी उणी-धुणी मला काढायची नाही तो माझा स्वभावही नाही. मी अनेक वर्ष काम केलं आहे अत्ता दुसरा पर्याय शोधला पाहिजे म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.

Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!

follow us