Download App

ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

  • Written By: Last Updated:

ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यात त्यांची प्राणज्योत मालवली…

बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार

शिरीष कणेकर यांना लेखक, बहारदार वक्ते, संगीतकार , नाटककार, तसेच वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिहीणारे स्तंभ लेखक अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ओळखलं जात होतं. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या जाण्याने साहित्य, कला, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया सर्वांकडून व्यक्त होत आहे.

नेहरूंची ऑफर स्विकारली असती तर Oppenheimer भारतीय असते, वाचा किस्सा…

शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय

शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ ला पुण्यात झाला होता. त्यांचं मुळगाव रायगड जिल्ह्यातील पेण हे आहे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यांच्या करिअरचा लेखाजोखा मांडायचा ठरला तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केलेली आहे. त्यामध्ये पत्रकारिता, वृत्तपत्रांमध्ये लेखन, विविध प्रकारांमध्ये ग्रंथलेखन लेखन, हिंदी चित्रपटांना संगीत देणे, नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले. त्याचबरोबर त्यांनी एकपात्री कार्यक्रमांचे लेखन,दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले. तसेच त्यांच्या अनेक कलाकृतींना सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळाले आहेत.

कणेकरांची ग्रंथसंपदा :

जोर्जं गन : एक लहरी फलंदाज, क्रिकेट-वेध, गाये चला जा, यादो की बारात, शिरिषासन, फिल्लमबाजी, कणेकरी, नट बोलट बोलपट, शिनेमा डॉट कॉम, रहस्यवल्ली, चाहटळणी, इरसालकी, चापलूसरकी, साखरफुटाणे, गोली मार भेजेमें, सुरपारंब्या, लगाव बत्ती, डॉ. काणेकरांचा मुलगा, मखलाशी, मनमुराद, नानकटाई , खटल आणि खटला, चापटपोळी, मेतकूट, फटकेबाजी, तिकडमबाजी, आंबटचिंबट, मोतिया, चंची, कट्टा, एककेचाळीस, टिवल्या बावल्या, कुराप, यारदोस, ते साठ दिवस, डॉलरच्या देशा,

कणेकरांना मिळालेले पुरस्कार :

कणेकरांना मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार, नाशिक महापालिका वाचनालयातर्फे सूरपारंब्या या लेखसंग्रहालृस सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार लगाव बत्ती या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं. वि जोशी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी शिरीष कणेकरांना सन्मानित करण्यात आले आहे.

Tags

follow us