Download App

पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा देणार का? बीडच्या आमदारांनी गुलाबरावांना घेरलं

मुंबई : जलजीवन मिशन (Jaljeevan Mission Scheme) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे भ्रष्टाचारात सापडली आहे. या योजनेवर कोणत्याही संस्थेचं लक्ष नसल्याने ठेकेदार बांधकामात गैरव्यवहार केला आहे. बीड (BEED) जिल्ह्यात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना घेरले.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, बीड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमतता आली आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाला असून बहुतांश कामे ठराविक एजेन्सींना दिल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण कामांमधील किती कामे कोणत्या एजेन्सींना देण्यात आलीत, याची माहिती देणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. जिल्ह्याला पाणी मिळाले पाहिजे आणि ज्यांनी पाण्यात पाप केले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीच्या अहवाल अनेक अधिकारी आणि ठेकेदार दोषी आढळले आहेत. त्यांमध्ये जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. भ्रष्ट्रचाराला पाठबळ देणाऱ्या अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत केली.

Maharashtra Politics : सत्ताराचं विधान पुन्हा चर्चेत; म्हणाले आधी जे गरीब खात होते तेच…

आमदार संदीप क्षिरसागर यांनी जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही नियम व अटी न पाळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कामे थांबवून या योजनेची चौकशी करण्याची मागणी क्षिरसागर यांनी केली आहे.

ठेकेदारांना फायदा व्हावा यासाठी जलजीवन योजनेत अनावश्यक बाबी घेतल्याचा आरोप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. यासंदर्भात अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील कोणलाही पाठीशी घातले जाणार नाहीत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन त्यांनी विधानसभेत दिले.

Tags

follow us