Download App

दोन गटांत तुफान राडा, सरकार अॅक्शन मोडमध्ये; मीरा रोडच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

Image Credit: Letsupp

Meera Road : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या दिवशीच दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. मीरा रोड (Meera Road) परिसरातील नया नगर भागात ही घटना घडली. या घटनेनंतर आज स्थानिक प्रशासनाकडून रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

काल 22 जानेवारी रोजी मीरा रोड भागात दोन गट आमने सामने येत तुफान दगडफेक झाली होती. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून राज्य सरकारच्या आदेशानंतर या भागातील अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या भागात असलेल्या बेकायदेशीर कामांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

अहमदनगरच्या गोविंददेव गिरी महाराजांनी करवून घेतला PM मोदींकडून ’11 दिवसांचा’ उपवास…

या कारवाईनंतर नया नगर परिसरातील एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सदरील व्यक्तीने लिहिले की, हे उत्तर प्रदेश नाही मुंबई आहे, असं कॅप्शन देत व्यक्तीकडून कारवाईचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दोन गटांत तुफान राडा झाल्यानंतर या प्रकरणाची दखल थेट राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थेट भाष्य केलं होतं. अवैध बांधकामे आणि अवैध धंदे बंद होणारच असं फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज लगेचच राज्य सरकारकडून महापालिका प्रशासनाला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

‘आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही’; ठाकरेंनी ठणकावलं

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याचवेळी दोन जातीवादी गट आमने सामने आल्याचं दिसून आलं होतं. यावेळी जमावाकडून तुफान दगडफेक केल्याचंही वृत्त समोर आलं होतं. या घटनेत काही लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन एका जमावावर हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी तणाव वाढताच पोलिसांनी जमावाला शांत केलं. त्यानंतर या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज