Download App

कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर, सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं; आदित्य ठाकरेंची टीका

MLA Aditya Thackeray’s press conference at Matoshree : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची (Aditya Thackeray) मातोश्रीवर आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला (Mahayuti) घेरलंय. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केलाय. या सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलंय. अनेक योजना बंद होणाच्या मार्गावर (Maharashtra Politics) आहेत. सरकारने मुंबईला पुर्णपूणे खड्ड्यात टाकलं असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईत घनकचरा कर लावण्याला ठाकरे गटाचा विरोध आहे. त्यांनी मुंबईकरांना घनकचरा कराचा विरोध करण्यासाठी आवाहन केलंय. हा अदानी कर आहे. मुंबईत अडीच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे कर लावलाच जातोय. या कराचा (Aditya Thackeray’s press conference) कडकडाडून विरोध करू, तर 31 मार्च पूर्वी सर्व मुंबईकरांनी आम्ही कराचा विरोध करतोय, असं लिहून पाठवावं. अदानींना मदत म्हणून हा कर लादला जातोय, असं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला ‘बंजारा’, वाचा, कसा होता तिकडंचा अनुभव

आधी धारावीसाठी अदानींकडून पैसे घ्या, अशी देखील मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय. मुंबईकरांची लूट सुरू आहे. बीएमसीवरून आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केलाय.

महायुती सरकारला एप्रिल फुल सरकार नाव दिले पाहिजे. राज्यातील सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं सरकारने म्हटलं होतं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवलं. एसशी गट म्हणून शिंदे शिवसेनेचा उल्लेख असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. आमच्या सरकारच्या काळात कोणतेही हिडन टॅक्स नव्हते, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

मुंबई पालिकेकडून अनेक बाबींवर कर लावला जात असल्याचा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. घनकचरासाठी कर कशासाठी लावला जातो, असा सवाल केलाय. अनेकदा कचरा उचलला जात नाही. मुंबईकरांकडून पैसे घेण्याआधी अदाणीकडून घ्यावेत. मुंबईत सगळ्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. निवडणुकीआधी घाईघाईने भूमिपूजन केले, आता काम सुरू करा. मुंबईतील 15 वार्ड ऑफिसर नाही, त्यांच्या नियुक्ती करा असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मराठी बोलणार नाही, महाराष्ट्रात राहून अशी बोलायची हिंमत कशी होते असा देखील सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

Video : पंकजांविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट

कोस्टल रोड उद्धव ठाकरे यांमुळेच झालाय. गेल्या शंभर दिवसात एकही नवीन योजना नाही. घनकचरा कराला आम्ही विरोध करणार. मराठीवरील अन्याय खपवून घेणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादू नका, राज्याला गृहमंत्री आहे का? असं देखील आदित्य ठाकरेंनी विचारलं आहे.

follow us