‘त्या’ व्हीपला भीक घालत नाही : भास्कर जाधवांनी गोगावलेंना मोडीत काढले..

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर […]

Untitled Design

Untitled Design

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर (Bhaskar Jadhav) जाधव यांनी दिली आहे.

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप लागू असले आणि त्या व्हिपचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. भरत गोगावलेंच्या (Bharatshet Gogawale) इशाऱ्याला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ambadas Danve एकातरी आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याचे सिद्ध करा… अन्यथा माफी मागा

शेतकऱ्यांचे काय झाले? जुनी पेन्शन योजना? धनगर समाज? ओबीसी समाज? मराठा समाजाचे काय झाले? शिंदे गटाला या सर्वांशी काही देणेघेणे नाही. हे सत्तापिपासू आहेत. ही जुमला पार्टी आहे. त्यांना येणारी निवडणूक सत्तेच्या, भ्रष्टाचाराच्या कुठल्याही मार्गाने जिंकायची आहे. आम्ही त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर केली आहे.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2003 साली पक्षांतर बंदी कायदा आणला होता. त्यामध्ये शेड्युल 10 हे जाणीवपुर्वक टाकण्यात आले होते. वाजपेयींना पक्षाचे दोन भाग मान्यच नव्हते. ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन करावा किंवा कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे. मुळ पक्ष हा त्यांचा पक्षच राहत नाही. मुळ पक्षाची निशाणी त्यांची राहत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना राजकीय पक्षाची तोडफोड मान्य नव्हती. असा तत्त्ववेत्ता नेता एकेकाळी भाजपमध्ये होता. आज भाजप आपल्याच नेत्याच्या तत्वाला तिलांजली देत आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.

Exit mobile version