Mla Mahendra Thorave : मुंबईतील कर्जतमध्ये एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करतानाचा संतापजनक व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करणारा सुरक्षा रक्षक शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mla Mahendra Thorave) यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मारहाण करणारा माझा बॉडीगार्ड नसल्याचं स्पष्टीकरण आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलंय.
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही…
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
महेंद्र थोरवे म्हणाले, जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोयं, त्या व्हिडिओतील सुरक्षा रक्षक माझा नाही, तो माझा बॉडीगार्ड नाही. याउलट ज्याला मारहाण झालेली आहे, तो माझा कार्यकर्ता असून माझा नातेवाईकही आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र असून ठाकरे गटाकडूनच हे कृत्य करण्यात आलं असल्याचा दावा आमदार थोरवे यांनी केलायं.
दरम्यान, व्हिडिओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या घटनेचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्वीटरवर पोस्ट केलाय. नेरळमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगितलं जात आहे. ठाकरे गटाने ‘मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!’ असा आशय लिहित ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ठाकरे गटाने काय म्हटलं?
ठाकरे गटाने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. यात कारमधील व्यक्तीला एक व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन मारहान करतांना दिसत आहे. ठाकरे गटाने लिहिलं की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डाने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायकां मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची व्यवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये. कायदा- सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय,असं ठाकरे गटाने म्हटलं.