Mohit Kamboj Tweet After Buki Anil Jaysighani Arrested : गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार असलेल्या आणि विविध मार्गांनी पोलिसांना गुंगारा देणारा बुकी अनिल जयसिंघानीयाच्या (Ani) मुसक्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. जयसिंघानीयाच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत आता उद्धव ठाकरेंचं नाव घेत पुढचा नंबर कुणाचा याबाबत ट्विट केले आहे.
Uddhav Thackrey Front Man Bookie Anil JaiSinghani Arrested By Mumbai Police !
Ex CP Sanjay Panday and One Ex CP Count Your Days ,U All Will Be Exposed Soon !
जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं …..— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 20, 2023
उद्धव ठाकरेंच्या फ्रंट मॅनला अटक असे म्हणत जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतः एक दिवस त्याच खड्ड्यात पडतात असे म्हणत माजी सीपी संजय पांडे आणि आणखी एका माजी सीपी आता तुम्ही तुमचे दिवस मोजा, लवकरच सर्वांचा खुलासा होईल! जो दुसर्यासाठी गड्ढे खोदतो तो स्वतःच एक दिवस त्याच खड्ड्यात पडतो असे कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
अमृता फडणवीसांना एक कोटींची लाच ऑफर केल्यानंतर अनिल जयसिंघानी पुन्हा चर्चेत आला होता. एवढेच नव्हे तर, जयसिंघानी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा एख फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. फरार बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांचे अनेक बुकी मित्रांचे युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्याशी संबंध आहेत. तसेच सन २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनिल जयसिंघानीचा शिवसेना पक्षात प्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्वीट केले आहे. तसेच या प्रकरणाचा लवकरच खुलासा होईल असे म्हणत मुंबईचे माजी सीपी संजय पांडेंसह आणखी एका माजी सीपींना तुमचे दिवस मोजण्यास सुरूवात करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यात आणखी काय घडोमोडी समोर येतात तसेच जयसिंघानी पोलीस तपासात काय माहिती उघड करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर. अमृता फडणवीस लाच प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हटल्या होत्या की, हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला लाचेच ऑफर येत असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. ब्लॅकमेल करणारी तरुणी आणि अमृता फडणवीस यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच गृहमंत्र्यांच्या घरात एवढं काही होत असून त्यांची पत्नीचं जर सुरक्षित नसेल तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुचकामी असून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्याची मागणी अंधारेंनी केली होती. तर भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले की, मागेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून लवकरच त्याचा खुलासा होईल. त्यामुळे आता लगेच त्यावर काही बोलता येणार नाही.