Download App

Ajit Pawar; वादग्रस्त मंत्र्यांना सक्त ताकीद, ‘अधिवेशन काळात जरा जपून बोला’

Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं आहे. यामध्ये सरकारच्या अपयशाचा पाढा दाखवण्यात आला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या काय कारवाई केली, असा सवाल विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांनी विचारला होता. आता महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारची भूमिका काय असणार असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.

यावर अजित पवार म्हणाले की एखादी घटना घडल्यानंतर मी ताबडतोब माहिती घेत असतो. बऱ्याचदा खोलात गेल्यानंतर त्यामध्ये अजितबात तथ्य नसतं. जी घटना पाठीमागच्या काळात घडली त्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. महिलांचा मान, सन्मान राखला पाहिजे. पण मागील घटनेनंतर पुन्हा अशी घटना घडली नाही. सगळ्यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सरकारमधील मंत्री किंवा सत्ताधारी पक्षाकडून असे कोणतेही विधान केले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका

सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती व्यवस्थित ठेवणे, विशेषता विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्याचे काम केले जाईल त्यांना व्यवस्थितपणे उत्तरं दिले पाहिजेत. बहुमताच्या जोरावर कसंही कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशी आमची कोणाचीही भूमिका असणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मी देखील विरोधी पक्षनेत्यांचं पत्र वाचले. पण त्या पत्रात कोणतेही ठोसपणे सांगितले नाही. त्यांचा तो हक्क आहे. आम्ही त्याला व्यवस्थितपणे उत्तर देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

follow us