महाराष्ट्र, मुंबई अन् उर्दूचं नातं नेमकं कसं? जावेद अख्तर यांनी केलं स्पष्ट

बहार-ए-उर्दू येथे उर्दू साहित्य अकादमीची 50 वर्षे पूर्ण झाली.

Bahar E Urdu

Bahar E Urdu

Javed Akhtar On Mumbai And Urdu Relationship :  बहार-ए-उर्दू येथे उर्दू साहित्य अकादमीची 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माणिकराव कोकाटे, जावेद अख्तर, सचिन पिळगावकर, शेखर सुमन, अली असगर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलंय की, मुंबई अन् उर्दूचं नातं खूपच घट्ट आहे. उर्दूचे सगळेच साहित्यकार मुंबईतील आहेत, हे अविश्वसनीय आहे.

उर्दुतील बहुसंख्य ज्येष्ठ लेखक अन् कवी

विसाव्या शतकामध्ये सुद्धा उर्दुतील बहुसंख्य ज्येष्ठ लेखक अन् कवी मुंबईतील (Mumbai And Urdu) आहेत. जेव्हा आपण त्यांचे नावं मोजतो, तेव्हा ते सगळे मुंबईत असल्याचं समोर येतं. काही सिनेविश्वात काम करत होते, काही इतर काम करत होते. महाराष्ट्र आणि मुंबईसोबत उर्दू लेखक आणि कवी याचं नातं अतिशय घट्ट आहेत, असं देखील जावेद अख्तर यांनी (Javed Akhtar) म्हटलं आहे.

डोमने हा इव्हेंट ऑर्गयानाईझ (Bahar e Urdu) केलाय. यावर बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलंय की, हे एक खूप चांगलं स्थळ आहे. मी इथे अनेकदा आलो आहे. मोठ्या कार्यक्रमांसाठी ही अतिशय़ योग्य जागा आहे.

चांगला कार्यक्रम होत आहे…

बरेलीतील घटनांवर बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं की, मला याविषयासंदर्भात जास्त माहिती नाही. त्यामुळे याविषयी मी जास्त बोलू शकणार नाही. याविषयी बोलणं त्यांनी टाळलं आहे. तर न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना जावेद अख्तर म्हटले की, यावेळी अशा विषया सध्या राहू द्या. चांगल्यावेळी असे विषय का काढायचे? चांगला कार्यक्रम होत आहे, त्याचं कौतुक करू या. खिरीमध्ये मीठ टाकायची काय गरज आहे? असा देखील सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय.

Exit mobile version