Download App

Mumbai : भिमा कोरेगाव प्रकरण: सामाजिक कार्यकर्ते नवलाखांना जामीन

Mumbai :  भिमा कोरेगाव प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Guatam Navlakha) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी शर्तींसह जामीन दिला आहे. नवलखा ऑगस्ट 2018 पासून तुरुंगात होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये तुरुंगातू नवी मुंबई येथील त्यांच्या घरी नजरबंद करण्यात आले होते.

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाडा परिसरात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. पोलिसांचे म्हणणे होते की या परिषदेत दिल्या गेलेल्या भडकाऊ भाषणांमुळे हिंसा भडकली होती. तसेच या कार्यक्रमााल माओवाद्यांचेही समर्थन होते. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 16 लोकांना अटक केली होती.

 

Tags

follow us