International Cruise Terminal : भारतात पहिले आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (International Cruise Terminal) मुंबईकरांच्या सेवेत सोमवारपासून दाखल होणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. या टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी नवा दरवाजा खुला होणार आहे.
सोन्याचे दर गगनाला; एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, वाचा आपल्या भागातला बाजारभाव
गेल्या काही वर्षांपूर्वीच सागरमाला उपक्रमांतर्गत मुंबईत पहिलं आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनल उभारण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे भारतातील अशा प्रकारचे पहिले आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनल असून 4.15 लाख वर्ग फूट क्षेत्रावर हे टर्मिनल बांधण्यात आलंय. हे टर्मिनल जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र विविध तांत्रिक व कामातील विलंबामुळे डिसेंबर 2024 पर्यंत ही डेडलाइन लांबवण्यात आली होती. आता अखेर युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर हे टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उभारण्यासाठी एकूण खर्च 495 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 495 कोटीपैकी 303 कोटी रुपये खर्च एकट्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. उर्वरित खर्च खासगी ऑपरेटर्सकडून करण्यात आला आहेत. भारतातील पहिले आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर सुमारे 200 क्रूझ जहाजे आणि दरवर्षी 10 हजार अधिक प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता असणार आहेत. हे टर्मिनल, आधुनिक यंत्रणा, मल्टी-लेव्हल पार्किंग, लक्झरी रिटेल आणि गॉरमेट डायनिंगसह एक अनुभवात्मक जागा पर्यटकांसाठी ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधीचं अमेरिकेत भाष्य; निवडणूक आयोगावरही थेट आरोप
सागरी पर्यटन वाढल्यास रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना आणि जागतिक पातळीवर मुंबईचा नवा चेहरा उभा राहील. हॉटेलिंग, ट्रान्सपोर्ट, टूर गाइड्स, स्थानिक कलावंत आणि हस्तकला यांना या संधीचा मोठा लाभ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा टर्मिनल म्हणजे सागरी अर्थव्यवस्थेचा नवा इंजिन ठरणार आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 2014 पासून क्रूझमधील प्रवासी संख्येत 400 टक्के इतकी उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. ‘क्रूझ भारत मिशन’ ने फेऱ्यांची संख्या यापुढे आणखी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्वित केले आहे. मुंबईतील आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल डिसेंबरपर्यत कार्यन्वित झाल्यामुळे आणखी या मिशनला हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.