Download App

“मनोज जरांगे शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब”, भाजप आमदार संजय केनेकरांचा हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर यांनी हल्लाबोल केला.

Sanjay Kenekar Criticized Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच भाजप आमदार संजय केनेकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेत मनोज जरांगेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर (Sanjay Kenekar) यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाइड बॉम्ब म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बुमरँग होणार आहे. हा सुसाइड बॉम्ब त्यांनी वैयक्तिक द्वेषापोटी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोडलेला आहे. असा जोरदार हल्लाबोल आमदार संजय केनेकर यांनी केला.

“मनोज जरांगेंची मागणी कायद्याला धरून, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण..”, उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?

समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाइड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थाने नुकसान पोहोचवणारा आहे. त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट न करता परस्पर सुसाइड बॉम्ब जरांगेसारखे या महाराष्ट्रात वापरतात, हे दुर्दैव आहे. शरद पवार त्यांच्या हयातीतल्या भूमिका अशाच राहिलेल्या आहेत.

त्यांनी कोणालाच मुख्यमंत्रिपदावर कायम बसू दिलं नाही. निश्चितपणे जरांगे हे गावगाड्यातले माणसं वापरून मराठा नेत्यांना सुरक्षित ठेवण्याची भूमिका ठेवून खऱ्या अर्थाने हा जरांगे पाटलांचा मोर्चा आहे. हा जातीय आणि व्यक्तिगत द्वेष आहे. कुठेतरी हा जातीय द्वेष शरद पवारांना सातत्याने खुपत असल्यामुळे हा जरांगे यांचा सुसाइड बॉम्ब शरद पवार वापरतात अशी टीका आमदार केनेकर यांनी केली.

उद्धव ठाकरे, शरद अन् अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा; वाचा, कोणत्या नेत्याने दिली साथ..

follow us