मुंबईत आज पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळायली. मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली होती.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली बांद्रा, गोरेगाव परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे.
हवामान विभागाने मुंबईत अलर्ट जारी केला आहे.
दादर, माटुंगा, सायन किंगसर्कल परिसरर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
मंत्रालय परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते.
पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील झाला आहे.