Download App

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, 10 सप्टेंबरला होणार मतदान

  • Written By: Last Updated:

मुंबई : सिनेट निवडणुकीसाठी (Mumbai University Senate Election) अनेक महिने विविध पक्ष, विद्यार्थी संघटना मतदार नोंदणीत व्यस्त होत्या. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्याची अधिसूचना मुंबई विद्यापीठाने आज जाहीर केली. या निवडणुकीसाठी 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 13 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Mumbai University declered Program of sinet elections)

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट सदस्यांच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पाच खुल्या प्रवर्ग आणि पाच राखीव जागांचा समावेश आहे. राखीव जागांपैकी एक अनुसूचित जाती आणि एक विमुक्त जाती व भटक्या जमाती तर तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत.

पदवीधर सिनेट सदस्यांच्या या दहा जागांच्या उमेदवारीसाठी 18 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. तर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या वैधतेबाबत अन्य काही तक्रार असल्यास त्यासंदर्भात 23 ऑगस्ट रोजी कुलगुरूंकडे अपील करता येईल.

India Vs Pakistan ; पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची उपांत्य फेरीत धडक 

25 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती विद्यापीठाने आज दिली.

या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

मागील पदवीधर सिनेटमधील सर्व दहा जागांवर युवा सेनेचे वर्चस्व होते. यावेळी युवासेनेने जोरदार तयारी केली असली तरी त्यांच्या विरोधात मनविसे, अभाविप, छात्रभारती आदी विद्यार्थी संघटना मैदानात उतरणार आहेत. मतदार नोंदणीसाठीही त्यांनी जोरदार तयारी केली. त्यामुळे ही पदवीधर सिनेट निवडणूक युवा सेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे.

Tags

follow us