मुंबईतील प्रसिद्ध गजानन वडापाव; शेळके मामा ढाब्याला एफडीएचा दणका; तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या

FDA: . मुंबईतील सहा, कोकणातील एक व पुणे विभागातील दोन आणि संभाजीनगरमधील नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

FDA ACTION

FDA ACTION

FDA Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (FDA Tukaram Munde) तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने हॉटेल, रेस्टारंट, नमकीन दुकानांवर जोरदार कारवाई सुरू आहे. पुणे आणि संभाजीनगरमधील अनेक नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. मुंबईतील सहा, कोकणातील एक व पुणे विभागातील दोन आणि संभाजीनगरमधील नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री गजानन वडापाव स्नॅक्स सेंटर (कांजूरमार्ग पश्चिम) चा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटवरच्या फेरतपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे या ढाब्यावर कार्यवाही केली जाणार आहे.


‘लग्नासाठी सरकारने मदत करावी’; सोलापुरात तरुणाचा ठिय्या, 1 लाखांच्या अनुदानाची मागणी

ठाण्यात अकरा नमकीन दुकानांवर कारवाई
अन्न औषध प्रशासनाने ठाण्यातील शिळ-दिवा रोड, खर्डी गाव परिसरात फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन व इतर खाद्यपदार्थ निर्मिती, विक्री करणाऱ्या अकरा दुकानांवर कारवाई करून वीस लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दुकानदारांनी आवश्यक वैध अन्न परवाना घेतला नव्हता. जागा अत्यंत घाणेरडी होती. पॅक केलेल्या खाद्यपदार्थ्यांचे लेबलवर लागू असलेल्या नियमांचे पालन करताना आढळले नाही.

“भीमनवारांचा राजीनामा घ्या; तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा”, रोहित पवारांची मागणी!


मुंबईतील सहा हॉटेलचे परवाने निलंबित

मुंबईतील प्रसिद्ध श्री गजानन वडापाव स्नॅक्स सेंटरवर एफडीए अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या ठिकाणी स्वच्छताचे नियम पाळले जात नव्हते. तसेच समर्थ स्विटस, एकविरा झुणका भाकर केंद्र, मनीषा स्वीट्स, नवाब सीख कॉर्नर, हॉटेल अश्विन, जय महाराष्ट्र मसाला डोस कॉर्नर यांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर पुणे विभागातील तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आलेत. त्यात साताराचे हॉटेल शाही, लोणवळा येथील साबेर रेस्टारंट, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सैराट बिर्याणीचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Exit mobile version