Download App

आजकाल कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणवून घ्यायला लागलाय, राज ठाकरेंचा टोला

  • Written By: Last Updated:

पुणे : आजकाल कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणवून घ्यायला लागलाय, कोणीही कशाचेही संदर्भ द्यायला लागला आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी आज पुण्यात बोलताना केली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्यात महापुरुषांना ओढणे हे राजकारण नव्हे. आजकाल कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणवून घ्यायला लागलाय, कोणीही कशाचेही संदर्भ द्यायला लागला आहे. याचे कारण माध्यमात मिळणारी प्रसिद्धी. जर माध्यमांनी यांना दाखवणं बंद केले तर हे सगळे बोलणं बंद होईल. असं मत त्यांनी व्यक्त केलं.

याच परिस्थितीमुळे मी सध्या कुठे बोलायला जात नाही. अशी उद्विगता त्यांनी व्यक्त केली. पण याचमुळे मी अधून मधून उगवतो अशी टीका होते. असं खंत त्यांनी व्यक्त केली.

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही; राज ठाकरे असं का म्हणाले ?

मुंबई मध्ये मोफत मिळालेल्या घरामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. त्यामुळे मुंबई बरबाद झाली. भविष्यात पुणे बरबाद व्हायलाही वेळ लागणार नाही. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना सरकारने स्वतःची ताब्यात घ्यावी. सरकारने ही योजना राबवावी आणि त्याचा फायदाही सरकारने घ्यावी. अशी भूमिका विकास आराखड्यात आम्ही घेतली होती. याची आठवण त्यांनी करून दिली.

 

Tags

follow us