बिल न भरल्याने पारघरमधील 443 शाळांची वीज कापली; विद्यार्थी करतायत अंधारात अभ्यास

Palgahr ZP School :  पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एकुण २१३४ शाळांमधील ४४३ शाळांनी वीजबिल भरले नसल्यामुळे शाळांची वीजजोडणी कापण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक होते. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि डासांच्या सहवासात शाळेत बसून शिक्षण घ्यावे लागत […]

Letsupp Image   2023 07 12T155647.965

Letsupp Image 2023 07 12T155647.965

Palgahr ZP School :  पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एकुण २१३४ शाळांमधील ४४३ शाळांनी वीजबिल भरले नसल्यामुळे शाळांची वीजजोडणी कापण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक होते. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि डासांच्या सहवासात शाळेत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.  त्याचप्रमाणे शाळांमधील दूरदर्शन संच, प्रोजेक्टर, संगणक अशी साधनेही वापराविना धूळखात पडल्याचे निदर्शनास येत आहे.

अजितदादांसोबत गेलेल्या संजयमामांना टक्कर देणार पवारांचा शिलेदार; मोठी शक्ती उभी करण्याचा निर्धार

जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल हे व्यावसायिक दराने आकारले जाते. हे बिल मुख्याध्यापक त्यांच्याकडे येणाऱ्या निधीतून भरत असतात. मात्र, सध्या हा निधी रोखला गेल्यामुळे अनेक शाळांना वीज बिलाचा भरणा करता आला नाही. याबाबत शासन दरबारी माहिती असतानाही वीज मंडळाने या शाळांची वीजजोडणी कापली आहे.

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

सध्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर असते. याचबरोबर अनेक शाळांचे मुख्याध्यापक विविध निधीतून वीज बिल भरत असतात. मात्र, यंदा सर्व स्तरावरून येणारे निधी रोखण्यात आले होते. वेतनेतर अनुदानही बंद आहे. यामुळे शाळांना कोणताही खर्च करणे अवघड झाले आहे.

Exit mobile version