Ram Kadam News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा ओघ सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकीय विरोधक त्यांना खोचक शुभेच्छा देत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी तर उद्धव ठाकरेंना अगदीच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार कदम आज हातात मराठी शब्दकोशाचे मोठ्ठे पुस्तक हातात घेऊन विधीमंडळाच्या आवारात दिसले.
‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला
लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आ. कदम यांच्याशी संवाद साधला. त्यांना या शब्दकोशाबद्दलच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कदम म्हणाले, ‘महाराष्ट्राचे माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना (उद्धव ठाकरे) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा महाराष्ट्र शब्दकोश आणला आहे. त्यांच्या भाषणात त्याच त्याच गोष्टी आहेत. नवीन काहीच नाही. तेच तेच शब्द आहेत. तेच तेच टोमणे आहेत. ‘नामर्दाची औलाद’, ‘मर्दाची औलाद’, ‘सह्याद्रीच्या कडेकपारीला तोडण्याचा डाव’, ‘मराठी माणसाला बदनाम करण्याचा डाव’, ‘महाराष्ट्राला बदनाम करताहेत’, ‘पाठीत खंजीर’, ‘अफजलखानाच्या फौजा’… याच्या पलीकडे शब्दच नाहीत. त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलण्याची गरज आहे. म्हणून हा शब्दकोश त्यांच्या वाढदिवशी भेट देतो.
भाजप पक्षात सगळेच आयाराम आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरही कदम यांनी सडेतोड उत्तर दिले. भाजपमध्ये सगळेच आयाराम आहेत अशी टीका करताना आधी त्यांच्याकडचे गयाराम का झालेत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जी व्यक्ती मंत्री, पत्रकारांना भेटत नव्हती. घरातून बाहेर पडत नव्हती. त्यांनी आम्हाला आयाराम गयारामचे प्रश्न विचारण्याआधी स्वतःकडचे गयाराम का झालेत याबद्दल भाष्य करावं, असे आव्हान कदम यांनी दिले.
Raj-Udhav Thackrey एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, मी, आला तर…
‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षात काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तुत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनल भेटून उपचार घ्या. म्हणजे, नरेंद्र मोदींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील’, असा टोला बावनकुळेंनी लगावला. ‘महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का, त्याकडे लक्ष द्या.’