मुंबई आणि ठाणे मिळून जवळपास ६० विधानसभा जागा आहे. ६० जागा म्हणजे जवळपास १/४ जागा इथे आहे. पण मुंबईमध्ये एक आणि ठाण्यात एक आमदार आहे. त्यामुळे पक्षाला इथे काम करण्याची गरज आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना “पक्ष एक नंबर होण्यासाठी बीएमसीची सत्ता महत्त्वाची” असं विधान त्यांनी यावेळी केलं.
…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला
यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष होण्यासाठी मुंबई महापालिका महत्त्वाची आहे. कारण ठाणे आणि मुंबई मिळून तब्बल ६० विधानसभा जागा मुंबईत आहेत. याचा अर्थ जवळपास एक चतुर्थांश महाराष्ट्र इथे आहे. त्यामुळे पक्षसाठी मुंबई महत्वाची आहे. असं विधान त्यांनी केलं.
“सध्याच्या सरकारकडून निवडणूका टाळून सध्या ज्यांच्या हाती सरकार आहे, त्यांच्याच हाती ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला लांबणीवर नेऊन आहे तेच सरकार कायम ठेवण्याचा प्रयत्न होत आहे” असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.
संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल
ते पुढे म्हणाले की, “या सरकारने कितीही निवडणूका लांबणीवर नेल्या तरी देखील कधी तरी निवडणूका होतीलच. निवडणूका जितक्या लांबतील तितकं राष्ट्रवादी पक्षासाठी चांगलं आहे.”