Download App

पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट, मुंबई दौऱ्याची दिली माहिती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबईला येण्याआधी मराठीतून ट्विट करत आपल्या मुंबई दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमधील 38 हजार कोटींच्या खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन व पायाभरणी केली जाणार असल्याची माहिती या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.


ट्वीटमध्ये म्हटलंय की, मी उद्या मुंबईत असेन. 38 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात पोस्टरबाजी करण्यात आलीय. बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे गिरगावत पोस्टर लागले आहेत. या पोस्टरमध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. गिरगांव येथे बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे बॅनर लावले आहेत. त्यात बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकलेले असे पोस्टर लावले आहेत. आज मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर अज्ञातानं लावले आहेत.

Tags

follow us