पूजा खेडकरचा राज्याच्या मुख्य सचिव अन् मागासवर्ग आयोगाला मेल; मेलमध्ये केली ‘ही’ मागणी

Puja Khedkar News : वादग्रस्त माजी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकरने राज्याचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला एक ई मेल केला आहे. माझं ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटची पडताळणी दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटीकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी पूजा खेडकरने या मेलद्वारे केली आहे. माझी ओबीसी […]

Pooja Khedkar

Pooja Khedkar

Puja Khedkar News : वादग्रस्त माजी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकरने राज्याचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला एक ई मेल केला आहे. माझं ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटची पडताळणी दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटीकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी पूजा खेडकरने या मेलद्वारे केली आहे. माझी ओबीसी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटवर सुनवणी होताना बाजू ऐकून घेतली नाही. अहमदनगरच्या सब डिव्हिजन कार्यालयाने मला विचारात घेतलं नाही. माझं हे प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी वर्ग करण्यात यावं असे पूजा खेडकरने या मेलमध्ये म्हटले आहे.

Pooja Khedkar : केंद्र सरकारची मोठी कारवाई, पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ

पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Exit mobile version