पुणे ः राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना डिजीटल सातबारा उपलब्ध व्हावा. यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. दरराेज नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. डिजीटल ७/१२ डाऊनलोड मध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून 36 लाख 58 हजार सातबारा नागरिकांनी केले डाऊनलोड आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा द्वितीय तर सोलापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे, असे या उपक्रमाचे प्रणेते तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात गेल्या तीन वर्षात ३ काेटी २६ लाख डिजीटल ७/१२ डाऊनलोड झाले आहेत. त्यातून राज्य शासनाला तब्बल ४९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. डिजीटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका डाऊनलोडमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर २ लाए ८० हजार मिळकत पत्रिका जिल्ह्यातील नागरिकांनी डाउनलाेड केल्या आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हा द्वितीय, तर नागपूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे.
संपूर्ण राज्यात गेल्या दोन वर्षात २० लाख ५८ हजार डिजीटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका डाउनलाेड झाल्या आहेत. त्यातून मिळाला १८ काेटी ८५ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे, उपक्रमाचे प्रणेते तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. तसेच महसूल विभागाचे हे महाभूमी पोर्टल सर्वोत्तम ठरत आहे. ई-सेवा पोर्टल आपले जमिनीचे संपूर्ण कायदेशीर वैध अधिकार अभिलेख म्हणजेच ७/१२ व मिळकत पत्रिका ऑनलाईन मिळविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी महाभूमी पोर्टलचा mahbhumi.gov.in वापर करण्याचे आनाहन त्यांनी यावेळी केली.