Download App

धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग

  • Written By: Last Updated:

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न प्रकरण व धमकी प्रकरणात नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. या प्रकरणात अटकेत असलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्याकडे पोलिस तपास करत आहे. अनिक्षा हिने पुणे-मुंबई प्रवासात अमृता फडणवीस यांचा कसा पाठलाग केला होता हे पोलिस चौकशीत उघडकीस आले आहे.

अमृता फडणवीस यांना फसविण्याच्या प्रकरणात अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे. तिला दोन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधून काही नवीन माहिती समोर येत आहे.

पुणे येथे २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांचा संगिताचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या अमृता फडणवीस होत्या. त्यासाठी आयोजकांनी काही पास अमृता यांना दिले होते. त्यातील काही पास त्यांनी सरकारी बंगल्यातील कर्मचाऱ्यांकडे दिले.
‘लवकरच येणार Hindenburg Research नवा अहवाल! नेमका काय होणार धमाका? सर्वांनाच उत्सुकता

त्यातील एक पास अनिक्षा हिने मिळविला होता. ती पुण्यातील संगित कार्यक्रमाला हजर राहिली होते. ते बघून अमृता यांना आश्चर्य वाटले. याबाबत त्यांनी अनिक्षा हिला विचारल्यानंतर तिने बंगल्यातील कर्मचाऱ्याकडून हा पास घेतल्याचे सांगितले. तसेच अमृता यांच्याशी बोलायचे असल्याचे अनिक्षा हिने सांगितले. त्यावेळी अमृता यांनी वेळ नसल्याचे अनिक्षाला सांगितले होते.

अमृता फडणवीस या पुण्यावरून मुंबईकडे येत होत्या. त्यावेळी अनिक्षा ही अमृता यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. त्यावेळी त्यांचे अंगरक्षक जाधव यांनी चालकाला तळेगावजवळ अचानक वाहन थांबविण्यास सांगितले होते. याबाबत अमृता यांनी विचारणा केल्यानंतर अंगरक्षकाने अनिक्षा यांना तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले होते. त्यावरून गाडी थांबविल्याचे सांगितले. परंतु अमृता यांनी अनिक्षा हिला असे काही सांगितले नव्हते. अनिक्षा ही खोटे बोलत असल्याचे अमृता यांच्या लक्षात आले.

मोदी आडनावावर टीका करणं भोवलं; गुजरात कोर्टाकडून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा

काही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून अनिक्षा हिला अमृता यांनी आपल्या गाडीत घेतले. त्या ठिकाणी दोघीमध्ये संगित कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. त्यानंतर काही वेळेने तिचे वडिल हे बुकींची माहिती पोलिसांना देतात. जुगाऱ्यांना अटक करून मोठी रक्कम आपल्याला मिळेल, असा प्रस्ताव अनिक्षाने अमृता यांच्यासमोर ठेवला होता. त्यानंतर अमृता हिने तिला आपल्या गाडीतून उतरून तिच्या गाडीत बसविण्यास पाठविले होते, असे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले आहे. त्यानुसार अनिक्षा जयसिंघानी यांच्याकडे पोलिस तपास करत आहेत.

Tags

follow us