Download App

आतापर्यंत रेल्वेकडे दुर्लक्ष, मात्र मोदी सरकारमध्ये परिस्थिती बदलली – एकनाथ शिंदे

  • Written By: Last Updated:

मुंबई : आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसना (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखविला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://www.youtube.com/watch?v=gXMghA2XkpQ

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांचे अभिनंदन करतो. गेल्या आठवड्यात जो ग्लोबल सर्वे झाला. त्यात आमचे पंतप्रधान एक नंबरवर होते. ही आम्हा देशवासीयांसाठी गर्वाची, अभिमानाची गोष्ट आहे. वंदे मातरम ट्रेनचे उद्घाटन हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभाग दुर्लक्षित होता. आपल्या कार्यकाळात रेल्वेला अच्छे दिन आले. काही लोक म्हणतात, महाराष्ट्राला बजेट मध्ये काय मिळालं? तर या अर्थसंकल्पात केंद्र सरकाराने रेल्वेला मोठी तरतूद केली. महाराष्ट्राला कधीही 13 हजार 500 कोटी रेल्वेला मिळाले नव्हते. हे पहिल्यांदा झाले आहे.

यावेळी ते म्हणाले की, मुंबईचे सर्व प्रकल्प, रेल्वे, विमानसेवा, सर्व रस्ते याला सहकार्य मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग निर्माण झालेत. मुंबई मेट्रो शुभारंभ झाला. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाले. या प्रकल्पाचा लाखो लोक लाभ घेत आहेत. आज्या वंदे मातरम् ट्रेन उदघाटनाने ही लाखो लोकांना लाभ होईल. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Vande Bharat Train : ‘रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे…’ मोदींची मराठीत भाषणाला सुरूवात 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साईबाबा, आई तुळजाभवानी, सिद्धरामेश्वर, पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी या रेल्वे मैलाचा दगड सिद्ध होतील. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानतो. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या इतिहासत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले जाईल, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमास केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत रेल्वेच्या दोन्ही गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूरसाठी हा गाड्या आहेत. या रेल्वेमुळे मुंबई ते सोलापूर हे अंतर जवळपास दीड तासाने कमी झाले आहे. साडेसहा तासांत ही रेल्वे मुंबईहून सोलापूरला पोहचणार आहे.

 

 

Tags

follow us