संजय राऊतांचा चेंडू आता राज्यसभेत, खुलाशातील मतांवरुन निलम गोऱ्हे नाराज

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभा सभापतीकडे (Rajya Sabha Speaker) पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर अक्षेप घेणं चुकीचे आहे. राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (1)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (1)

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभा सभापतीकडे (Rajya Sabha Speaker) पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर अक्षेप घेणं चुकीचे आहे. राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी सादर केलेल्या खुलाशाचा विचार केला आहे. त्यावरुन मला असे दिसून आले आहे की संजय राऊत यांनी सभागृहाच्या नेमण्यात आलेल्या विशेष अधिकार समितीच्या निःपक्षपातीपणावर आणि समितीच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांनी असा संशय उपस्थित करणे योग्य नाही. त्यांनी विशेष अधिकार समितीच्या खुलाशात व्यक्त केलेल्या मतांशी मी पुर्णता सहमत नाही. विशेष अधिकारभंग व अवमानाची सुचना राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवीत असल्याचे त्यांनी विधानपरिषदेत घोषणा केली.

शिंदेंचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, फडणवीसांची माहिती

संजय राऊतांवरील कारवाई संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूर दोऱ्यात संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला होता. यानंतर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या विरोधात विधानसभा आणि विधानपरिषदेत हक्कभंग दाखल केला होता.

Exit mobile version